आशाताई बच्छाव
मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये-शेतकरी नेते विनायकराव पाटील उमरगा: मराठा समाजाला कुणबी आरक्षणाबाबत सरकार दखल घेत नाही ,दिवसेंदिवस आरक्षण देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये वैफल्य,निराशा आली आहे.उमरगा तालुक्यातील दाबका येथील मराठा आरक्षणासाठी कै.प्रशांत गोविंदराव पवार यांनी आत्महत्या केली असता ,जिल्हाभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा योद्धा ज्येष्ठ शेतकरी नेते समाजसेवक विनायकराव पाटील साहेब यांनी भेट घेऊन कुटुंबाची विचारपूस केली .मराठा समाजातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने आणि अनेक तरुण उच्च शिक्षीत असून सुद्धा अनेक संधीचा फायदा आरक्षण नसल्याने होत नाही. तरी निराश आणि हताश न होता तरुणांनी आपल्या कुटुंबाचे हित लक्षात ठेवून संयम राखला पाहिजे . आपल्या कुटुंबाचा ही विचार केला पाहिजे.आपण आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा लढू आणि आरक्षण मिळवू .आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही .त्यामुळे भविष्याचा विचार करून यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. लवकरात लवकर हा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा .अशी विनंती सरकारला यावेळी केली .आणि या कुटुंबाच्या सोबत कायम आहे अशी भावना व्यक्त केली. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, प्रा.एस.के. पटेल,दाबका गावचे सरपंच गोविंद सूर्यवंशी, विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते.