आशाताई बच्छाव
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ वाशीम मध्ये आंदोलन
भाजपा व हिंदुत्ववादी संघटनाचा सहभाग. वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ
पहलगाम येथे दहशत वाद्यांकडून हिंदू पर्यटकांवर हमला करण्यात आला, यात सुमारे 27 पर्यटकांचा मृत्यू झाला, या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ वाशिम येथे आमदार श्याम खोडे यांचा नेतृत्वात व राजू पाटील राजे यांचा मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले,
या वेळी विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना,दुर्गा वाहिनी, शिवप्रतीष्ठान हिंदुस्थान, धर्मरक्षक ग्रुप, बागेश्वर धाम सेवा समिती, सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या घटनेचा तीव्र निषेध केला.
दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला धर्म विचारून त्यांची हत्या केली, हा दहशतवादी हल्ला हिंदू धर्माचा विरोधात केलेला हमला आहे, या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे, या दहशतवादी घटनेचा विरोध करताना हिंदूंच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली,
या घटनेच्या जाहीर निषेधानंतर माननीय जिल्हाधिकारी भुवनेश्वर देवी यांना निवेदन सादर करण्यात आले, यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.