Home बीड बीड जिल्ह्यात भामट्यांचा सुळसुळाट पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोने नेहले चोरून

बीड जिल्ह्यात भामट्यांचा सुळसुळाट पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोने नेहले चोरून

227

आशाताई बच्छाव

1001416374.jpg

बीड जिल्ह्यात भामट्यांचा सुळसुळाट पोलीस असल्याचे सांगून साडेतीन तोळे सोने नेहले चोरून

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/किल्लेधारूर दि.१४ एप्रिल २०२५ तालुक्यातील मैंदवाडी येथील ७९ वर्षीय शेषेराव सटवाजी मैंद या वृद्धाची दोन भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून थेट साडेतीन तोळे सोन्याची फसवणूक केल्याची घटना रविवारी (दि.१३) घडली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शेषेराव मैंद हे धारूर येथे कामानिमित्त आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी केज बसने कासारी फाट्याजवळ उतरल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी खाजगी वाहनाची वाट पाहत होते. त्याचवेळी एक भामटा मोटरसायकलवर आला व स्वतःला पोलीस खात्यातील अधिकारी असल्याचे सांगून त्याने एका २५ वर्षाच्या तरुणाची झडती घेत असल्याचा बनाव केला. त्यानंतर त्या भामट्याने विश्वास बसण्यासाठी शेषेराव यांचीही झडती घेतली. यावेळी शेषराव यांनी त्यांच्या खिशातील अडकित्ता, पान, सुपारी, चुन्याची डबी व गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट,१ एक ग्राम बदाम व दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या असे एकूण साडेतीन तोळे सोने काढून रुमालात गुंडाळून त्या भामट्याच्या ताब्यात दिले. त्याने सर्व सामान व दागिने तपासल्याचे भासवून पुन्हा रुमालात गुंडाळल्याचे दाखवले, आणि नंतर संपूर्ण सोने घेऊन प्रसार झाला. याप्रकरणी शेषराव महिंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून किल्लेधारूर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleपरळीत अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केले विनम्र अभिवादन!
Next articleप्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना भीम रत्न पुरस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.