आशाताई बच्छाव
परळीत अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केले विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना शिक्षणाचा अधिकार दिला – अँड.मनोज संकाये
बीड/परळी वैजनाथ दि. १४ एप्रिल २०२५ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांना घटनेच्या माध्यमातून शिक्षणरुपी ज्ञानाचा तिसरा डोळा प्रदान केला. त्यामुळे आज सर्वसामान्य माणसाने आपली प्रगती केली शिक्षणाने त्यांचे जीवन सुखमय केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अनिल चौधरी, काशिनाथ सरवदे, प्रवीण रोडे, प्रशांत सौंदळे, संदीप चौधरी, विशाल नरवणे, कैलास रिकीबे, देविदास मुंडे, प्रमोद गिरी, राम चाटे, संतोष कांबळे, सुंदर आव्हाड, पापा क्षीरसागर, गजानन शिंदे आदीसह मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.