Home नाशिक मेशी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

मेशी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

78

आशाताई बच्छाव

1001415851.jpg

देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी:- तालुक्यातील मेशी येथे सालापदाप्रमाणे हनुमान जयंती साजरी देवळा तालुक्यातील मेशी येथे सालाबदाप्रमाणे यावर्षी देखील हनुमान मित्र मंडळ तर्फे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी मंदिरात सहा वाजून पाच मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी मित्र मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मेशी व परिसरातील अनेक भाविकांनी सदर महाप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी हनुमान भक्त यश पवार यांनी एक हजार हनुमान चालीसांचे वाटप केले हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी समाधान कदम, सागर शिरसाठ, सुशांत घोडे ,बबलू खैरनार ,नितीन अहिरे ,ज्ञानेश्वर वानखेडे , श्रीराज पाटिल तसेच बाल गोपाळ हनुमान भक्तांनी परिश्रम घेतले