Home भंडारा डॉ.अक्षय कहालकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

डॉ.अक्षय कहालकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

74

आशाताई बच्छाव

1001395049.jpg

डॉ.अक्षय कहालकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा पुढाकार

संजीव भांबोरे
भंडारा – तालुक्यातील टेकेपार( माडगी )येथील रहिवासी व सर्वसामान्य कुटुंबातील हसतमुखत असलेली व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अक्षय ईस्तारी कहालकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता ,व वैद्यकीय क्षेत्रातील कामाची देखभाल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे व सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे भंडारा व सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे अड्याळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा येथे साई मंदिर समोर त्यांच्या सुरू असलेल्या दवाखान्यात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 8 एप्रिल 2025 ला सायंकाळी 5 वाजता सन्मानचिन्ह, शाल, व गुलाबाच्या फुलाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अक्षय कहालकर म्हणाले की, आपण माझ्या कार्याची दखल घेऊन माझा तो जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे व आपले हे ऋण आयुष्यात कधीच विसरणार नाही असे सुद्धा यावेळी ते म्हणाले. यावेळी पल्लवी रोडगे, पंकज कहालकर, गरीबदास टेंभेकर भंडारा प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleजळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला – आ. सदाभाऊ खोत
Next articleस्तुत्य उपक्रम राबवल्याने नवतरुण युवकांचे कार्य कौतुकास्पदच ; तहसिलदार राम बोरगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.