आशाताई बच्छाव
भाजपचे संघटन वाढविण्यात कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे
लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन
कोरची येथे भाजपचा स्थापना दिवस व ध्वजारोहण कार्यक्रम
कोरची, गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:
भारतीय जनता पक्षाचे देशात सर्वाधिक १.५ कोटी प्राथमिक सदस्य झाले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि आपण आज भारतीय जनता पार्टी चे सदस्य आहोत याचा अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाची स्थापना ४५ वर्षापूर्वी ६ एप्रिल १९८० रोजी झाली त्यावेळी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी भारतीय जनता पार्टी चे संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्याच प्रयत्नामुळे आज भाजप जगात क्रमांक एक चा पक्ष बनलेला आहे. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम मोलाचे आहे. त्यांचे योगदान पक्षाच्या संघटन वाढीसाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले. कोरची येथे आयोजीत भाजप स्थापना दिवस व ध्वजारोहण कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टी तालुका कोरची च्या वतीने तालुका भाजपा कार्यालयासमोर भाजपचा स्थापना दिवस व ध्वजारोहण कार्यक्रम आज दि ६ एप्रिल रोजी भाजपचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते भाजपचा ध्वज फडकविण्यात आला. तदनंतर भाजपचे देशात १.५ कोटी सदस्य झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम कार्यकर्त्यांनी थेट प्रक्षेपण द्वारे टीव्ही वर पाहिला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी एकाच वेळी महाराष्ट्रातील १२ लाख कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ बिसेन, भाजपचे जिल्हा सचिव प्राचार्य देवराव गजभिये, जिल्हा सचिव आनंद चौबे, कोरची चे तालुका अध्यक्ष नसरूदीन भामांनी, कोरची पं. स. चे सदस्य सदाराम नरूटी, अशोक गावतुरे, मधुकर नखाते, तालुका महामंत्री नंदलाल पंजवानी, तालुका महामंत्री घनश्याम अग्रवाल,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शिलाताई सोनकोतरी, नगरसेविका प्रतिभाताई मडावी, तालुका सचिव प्रेमिलाताई मांडवे, अनुसूचित जाती आघाडीचे तालुका अध्यक्ष मनोज टेंभुर्णे, बापूजी उईके, यशवंत वालदे तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर कोरची तालुका भाजपा अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया लोकसभा समन्वयक तथा निवडणूक निरीक्षक प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.