आशाताई बच्छाव
अखेर त्या ४९ रिक्त पोलीस पदांची भरती सुरू माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश
आरक्षणानुसार उर्वरित रिक्त असलेल्या ४९ पोलीस रिक्त पदांना भज- ब व भज- क मधून भरण्यास मंजुरी
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने सन २०२४ मध्ये ९१२ पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पद भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु त्यामधील विजा- अ चे ९ व भज – ड चे ४० असे ४९ उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही ४९ पदे रिक्त होती. ही पद भज- ब व भज- क मधून भरण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या माध्यमातून शासनाकडे केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून आरक्षणा नुसार रिक्त असलेली उर्वरित ४९ रिक्त पदे शासन धोरणाप्रमाणे भज- ब चे २० व भज- क चे २९ या प्रबर्गामधून तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीनुसार गुणवत्तेच्या आधारावर भरण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून या पदभरतीच्या संदर्भातील कारवाई पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे.
शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन न्याय दिल्याने माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी शासनाचे आभार मानले आहे . तर उमेदवारांनी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे.