Home उतर महाराष्ट्र अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या...

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मा. मंत्री, लोकनेते बाळासाहेब_थोरात यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न

74
0

आशाताई बच्छाव

1001380089.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मा. मंत्री, लोकनेते बाळासाहेब_थोरात यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला अमृतवाहिनी कॉलेजच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक विवेक धुमाळ, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ तसेच विविध मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन इमारतीच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा प्राप्त होतील आणि कृषी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल. तसेच हे कृषी महाविद्यालय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र ठरेल, असे मत मा.कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here