Home नागपूर नागपूर येथे बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा याकरिता हजारोंच्या संख्येने...

नागपूर येथे बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा याकरिता हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका शांती मार्च मोर्चात सामील

36
0

आशाताई बच्छाव

1001380025.jpg

नागपूर येथे बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा याकरिता हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका शांती मार्च मोर्चात सामील

 

संजीव भांबोरे
नागपूर -आज दिनांक 2 एप्रिल 2025 बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात सोपविण्यात यावा याकरिता दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंत शांती मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक व उपासीका सामील झाले होते. सदर मोर्चा भिक्षुनी धम्मदिना व संपूर्ण भिक्षु संघ यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य शांती मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे की,बौध्दगया टेम्पल एक्ट 1949 चे माध्यमाने बिहार सरकार व केंद्र सरकार देशातील संविधान प्रदत्त अधिकारांचे उल्लंघन करून बौध्दांवर अन्याय करीत आहे . तथागत गौतम बुध्दांना ज्या ठिकाणी संबोधि ज्ञानाची प्राप्ती झाली . अशा जगातील सर्व बौद्धांचे परम पवित्र स्थान असलेले *महाबोधी महाविहार* बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1891 पासून अनागारिक धर्मपाल यांनी सूरु केलेल्या 134 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातील व भारतातील आदरणीय भिक्खूगण भदन्त आकाश लामाजी , भदन्त विनाचार्य जी , तसेच समस्त भिक्खू / भिक्खुणी संघ , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारा स्थापन केलेल्या रजिस्टर्ड मातृत्व संघटना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,समता सैनिक दल,तसेच देशातील सर्व बौद्ध संघटनांच्या , धार्मिक व सामाजिक संघटना आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मागील १२ फेब्रुवारी 2025 पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणामुळे आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे .
बौद्ध जनतेवर अन्याय करणाऱ्या बौध्दगया टेम्पल एक्ट 1949 ला निरस्त करण्यासाठी व बौध्दगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील बौद्ध भिक्षू , उपासक , उपासिका संघाचा सर्व बौद्ध व आंबेडकरवादी संघटना तसेच संविधान प्रेमी जनतेने शांती मार्च मोर्चाला समर्थन दिले . सदर शांती मार्च मोर्चात बौद्ध उपासक उपासिका सफेद वस्त्र ,पंचशील ध्वज, पंचशील दुपट्टा , सोबत घेऊन सामील झाले होते.
हा मोर्चात आल इंडिया बुद्धिस्ट फोरम ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ,समता सैनिक दल,आणि इतर सर्व धार्मिक आणि सामाजिक, बौद्धिक संघटना नागपूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here