
आशाताई बच्छाव
ईश्वर रामलाल पांढरे यांची धनगर समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली
भोकरदन युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील भारतीय जनता पार्टीचे युवक कार्यकर्ते ईश्वर रामलालजी पांढरे यांची धनगर समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा युवक अध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष विकास महात्मे यांनी एका पत्राद्वारे निवड केली आहे या निवडीबद्दल गावातील नवयुवक तरुण मंडळी कडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे व आसपासच्या खेड्यातील समाज बांधवांच्या वतीने व मित्रमंडळीच्या वतीने फोन द्वारे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे सदरील पत्रामध्ये आपण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना येणाऱ्या सामाजिक व शासकीय कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हिराणीने भाग घेऊन सदरील प्रश्न मार्गी लावावे गावा खेड्यापासून ते डोंगरापर्यंत असणाऱ्या समाजाचे प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवावे व सोडणार यामुळेच आपली धनगर समाज संघर्ष समिती मराठवाडा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे