Home बुलढाणा मोठी बातमी! “माझ्यासोबत विवाह कर नाही तर तुला सोडणार नाही!” – किरण...

मोठी बातमी! “माझ्यासोबत विवाह कर नाही तर तुला सोडणार नाही!” – किरण देवानंद थोरातने -इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध !

27
0

आशाताई बच्छाव

1001375263.jpg

मोठी बातमी! “माझ्यासोबत विवाह कर नाही तर तुला सोडणार नाही!” – किरण देवानंद थोरातने -इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:- बुलडाणा किरण देवानंद थोरात याला बायको नाही परंतु त्याने एका विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्या इच्छुविरुद्ध संबंध ठेवले. “माझ्यासोबत विवाह कर नाही तर तुला सोडणार नाही!” अशा पवित्र्यात किरण थोरात आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एका महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी किरण देवानंद थोरात रा. धाड हा एका विधवा महिलेशी जवळीक साधून होता. 2018-19 मध्ये रेशन कार्ड काढण्यासाठी सदर महिला तहसील ऑफिस बुलढाणा येथे गेली होती आणि तिथेच खाजगी काम करीत असणाऱ्या आरोपीची ओळख झाली. दरम्यान आरोपी किरण थोरात याने जवळ आलेल्या मोबाईल नंबर वर अनेकदा फोन करून महिलेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोपीची पत्नी सुद्धा वारलेली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सदर महिलेला माझ्यासोबत विवाह कर नाहीतर मी तुला सोडणार नाही तुझ्या मुलावर खोटा अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करील अशी धमकी सदर महिलेला व तिच्या आईला आरोपी देत होता. दरम्यान 21 मार्च रोजी दुपारी महिला बुलढाणा येथील पाठक गल्लीत श्रीकृष्ण डेअरीवर आली असता, कारंजा चौकात आरोपी किरण थोरात याने महिलेचा पाठलाग केला आणि महिलेशी नाहक वाद घातला. माझ्यासोबत चल आणि लग्न कर अशी जबरदस्ती आरोपीने केली. माझ्यासोबत आली नाही तर जिवाने मारून
टाकेल अशी धमकी सुद्धा यावेळी दिली. पीडित महिला घाबरल्याने त्याच्या स्कुटीवर बसून पाठक गल्ली येथून धाड गावाला जाण्यासाठी निघाली. आरोपीच्या घरी कोणी नव्हते. त्याचा फायदा घेत किरण थोरातने महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरीक संबंध ठेवले. बायको म्हणून धाडला राहा असे आरोपीने म्हटल्यावर महिलेने याला विरोध केला तेव्हा तुला जिवे मारील अशी धमकी दिली. या पीडित महिलेच्या तक्रारीवरून किरण थोरात विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here