Home भंडारा सतगुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव (पहेला) येथे आरोग्य तपासणी शिबिर व त्वचारोग...

सतगुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव (पहेला) येथे आरोग्य तपासणी शिबिर व त्वचारोग आजारांवर व्याख्यान कार्यक्रम संपन्न

69

आशाताई बच्छाव

1001374268.jpg

सतगुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव (पहेला) येथे आरोग्य तपासणी शिबिर व त्वचारोग आजारांवर व्याख्यान कार्यक्रम संपन्न

 

संजीव भांबोरे
भंडारा _तालुक्यातील पहेला येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे 31 मार्च 2025 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता डॉ. संजय एकापुरे यांच्या सहकार्याने सद्गुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव येथे विद्यार्थी व कर्मचारी यांच्या करिता आरोग्य शिबिर डॉ. हरिदास हटवार ,डॉ. संजय मानकर, (सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी )यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. सर्वांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले .त्यात वैयक्तिक स्वच्छता ,आहार विहार , ध्यानधारणा, योगा बद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह. भ .प .चौधरी महाराज हे होते. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी यांना औषधी व खाऊचे वितरित करण्यात आले .यावेळी ह. भ .प. चौधरी महाराज यांनी पाहुण्यांचे शाल ,श्रीफळ, प्रतिमा भेट देऊन आभार व्यक्त केले .यावेळी यशस्वी करण्याकरता रेवननाथ नेरकर ,सागर उजवणे ,डॉ. शशिकांत हजारे यांनी सहकार्य केले .यावेळी सर्व कर्मचारी व स्वयंसेवकांचे कार्यक्रम यशस्वी बद्दल आभार मानण्यात आले.

Previous articleव्हाट्सअप स्टेटससाठी नवीन फिचर – आता थेट संगीत जोडता येणार!
Next articleमहापालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.