आशाताई बच्छाव
राज्य सरकारची मोठी घोषणा
कौळाणेत होणार जिल्हाधिकारी कार्यालय!
मुंबई विशेष प्रतिनिधी:- नुकत्याच झालेल्या अधिवेशना दरम्यान राज्य सरकारने एक मोठा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असून,या निर्णयामुळे आता मालेगाव तालुक्यातील नागरिकात उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे.
याबाबत सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, सध्या मालेगाव शहरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यरत असून, त्या कार्यालयाची व्याप्ती वाढवून, नियोजित जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव शहर व तालुक्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कौळाणे (नि.) येथील श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या ऐतिहासिक राजवाड्यात सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्यामुळे मालेगाव शहर व तालुक्याच्या लौकीकात भर पडणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
(ए.फु.)