आशाताई बच्छाव
लाडक्या बहिणीची चिंता वाढली! सरकार देणार आता फक्त पाचशे रुपये महिना!!
मुंबई:- राज्य सरकारने निवडणूकी पुर्वी मोठा गाजावाजा करुन सुरू केलेली लाडकी बहिण योजना आता लाडक्या बहिणीची चिंता वाढविणारी धक्कादायक बातमी समोर येत आहे.
दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणारी हि योजना विविध मुद्द्यांवर चर्चेत होती.तर या योजनेतून यापूर्वीच अनेक लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या आहेत.तर दुसऱ्या बाजूला आता राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शासनाला फुकटच्या योजना तात्काळ बंद करण्याच्या सुचना केल्या असून, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या ऐवजी पाचशे रुपये दरमहा दिले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.