Home अमरावती कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक; प्रहार संघटनेचे ११ एप्रिल ला राज्यभर आंदोलन,

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक; प्रहार संघटनेचे ११ एप्रिल ला राज्यभर आंदोलन,

44
0

आशाताई बच्छाव

1001369387.jpg

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक; प्रहार संघटनेचे ११ एप्रिल ला राज्यभर आंदोलन, आमदाराच्या घरासमोर टेंभी पेटवणार. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा ब्युरो प्रतिनिधी. अमरावती. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राहा संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत .शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटने कडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आहे ११ एप्रिल रोजी आमदारांच्या घरासमोर टेंभी पेटून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बारामती मधील शिवनगर येथील दी माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे एक कार्यक्रमाच्या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्च पर्यंत कर्ज भरण्याचे आवाहन केले होते इतकेच नाहीतर पाच वर्ष काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी थेटर सांगितले यामुळे महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होणार नसण्याचे स्पष्ट झाले .आहे यावरून विरोधकाकडून सरकारवर टीका केली जात आहे अशातच आता बच्चू कडू हे देखील आक्रमक झाले असून ,त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आज गुढीपाडव्या दिवशी सरकारला दिला आहे.आज गुढीपाडव्याच्या निमित्त बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले .तसेच सरकारने निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाचे आश्वासन दिले होते त्या संदर्भात एक मोठे आंदोलन उभे करणार आहोत. या आंदोलनासाठी सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरासमोर रात्री १२ वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा घेऊन टेंबे मशाल घेण्यात पेटवण्याचे आंदोलन करणार आहोत निवडणुकीच्या वेळी सरकारने जे आश्वासन दिले होते त्याची दखल घ्यावी किंवा टेंबेच्या मशालीने आम्हाला पेटून द्या असे निर्देश सरकारला देणार आहोत .दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी ११ एप्रिल रोजी रात्री १२ वाचता ये आंदोलन करणार आहेत. दरम्यान दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देखील आज गुढीपाडव्याच्या दिवशी अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल केलेल्या विधानाचा कोल्हापूर येथे निषेध केला त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक आधी १०००दिवसाच्या आज शेतकऱ्यांचा समावेश सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सदस्य शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्त्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले अशी टीका स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली.

Previous articleप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला दिली भेट
Next articleमहिला बचत गटाच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here