
आशाताई बच्छाव
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला दिली भेट
गौतम बुद्ध ला नमन व बाबासाहेबांना केले अभिवादन
भदंत सुरेई ससाई यांनी प्रधानमंत्री यांना बोधगया बुद्धांच्या स्वाधीन करा दिले निवेदन
संजीव भांबोरे
नागपूर_आज दिनांक 30 मार्च 2025 ला सकाळी 9.30 वाजता भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला भेट देऊन तथागताला नमन केले त्याचप्रमाणे बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शाल, श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देऊन दीक्षाभूमी येथे सत्कार केला .त्याचप्रमाणे बोधगया येथे 12 एप्रिल पासून महाबोधी महाविहार आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा. बी. टी. अक्ट 1949 तात्काळ हटविण्यात यावा, बोधगया येथील ९ लोकांची कमिटी पूर्णता बरखास्त करून त्यामध्ये संपूर्ण बुद्धिस्ट घेण्यात यावे , दीक्षाभूमी जवळच असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी,या मागणीचे निवेदन सुद्धा भदंत
ससाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी, राजेंद्र गवई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.