
आशाताई बच्छाव
धुळे नंदुरबार संदीप पाटील ब्युरो चीफ –शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे आज चैत्र शनी अमावास्या निमित्त वर्षातून येणाऱ्या चार शनी अमावस्या त्यातील आज चैत्रशनी अमावस्या निमित्ताने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तसेच शेजारील राज्य मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त श्री क्षेत्र शनिमांडळ शनी मंदिर येथे येतात या शनी मंदिराचे ऐतिहासिक महत्व आहे. राजा विक्रम सिंग यांनी साडेसाती मुक्ती येथे मिळवलेले आहे साडेसाती मुक्ती धाम म्हणून विशेष महत्त्व आहे एकूण भारतातील चार साडेसाती मुक्तिधांपैकी एक शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र याच्या या दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील हे स्थान आहे वर्षातून येणाऱ्या चार शनि अमावस्या च्या यात्रा उत्सव आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो भाकर आणि भात बेसन आमटी असते श्री क्षेत्र शनी मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. मागील काही वर्षांपूर्वी मंदिराचा भव्य जिर्णोद्धार करण्यात आला शनी मंदिराचा कळस सोन्याचा आहे भव्य आणि दिव्य निर्माण करण्यात आलेले आहे वर्षातून चार शनी अमावस्या या शनिवारच्या दिवशी येतात म्हणून मोठ्या शनि अमावस्या म्हणून त्यादिवशी महाप्रसाद आणि यात्रा उत्सव भरत असते आणि भाविक भक्त या साडेसाती मुक्ती धाम येथे येत असतात. शनि ट्रस्ट समितीचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात येत असते.