
आशाताई बच्छाव
जालना जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन
जालना प्रतिनिधी दिलीप बोंडे
जालना जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षकाने दिनांक 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी जालना यांना सामूहिक आत्मदाण्याचे निवेदन सादर केले असून हे शिक्षक दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंबड चौफुली पासून मोर्चा घेऊन सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षकांच्या सह्या असून त्या निवेदनात असे म्हटले आहे की, तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंजुरीने दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णय निर्गमित केला होता या शासन निर्णयात सुमारे 52 हजार 500 शिक्षकांना 20 टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा त्या शिक्षकांच्या हेडन्याय अनिवार्य खर्चातून त्यांचा पगार करावा असे म्हटले होते परंतु या शासन निर्णयास देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने डिसेंबर 2024 च्या पुरवणी अर्थसंकल्पात त्याला कुठलीही तरतूद न केल्याने व मार्च 2025 26 च्या अर्थसंकल्पात सुद्धा कुठलीच तरतूद न केल्याने राज्यभरातील शिक्षकांत शिक्षका ंत असंतोष निर्माण झाला आहे यातूनच मागील आठवड्यात बीड येथील विनाअनुदानित शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गळफास लावून घेत या प्रश्नाकडे राज्याचे व सरकारचे लक्ष वेधले होते त्यानंतर चार बांधवांचा सरकारने अर्थसंकल्पात कुठल्याच निधीची तरतूद न केल्याने नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे
तसेच दिनांक पाच मार्च 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आंदोलन सुद्धा 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी याकरता सुरू आहे.