
आशाताई बच्छाव
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ,विशाल शांति मार्च २ एप्रिल ला दीक्षाभूमी ते संविधान चौक नागपूर येथे आयोजन
संजीव भांबोरे
नागपूर -बौध्दगया टेम्पल एक्ट 1949 चे माध्यमाने बिहार सरकार व केंद्र सरकार देशातील संविधान प्रदत्त अधिकारांचे उल्लंघन करून बौध्दांवर अन्याय करीत आहे . तथागत गौतम बुध्दांना ज्या ठिकाणी संबोधि ज्ञानाची प्राप्ती झाली . अशा जगातील सर्व बौद्धांचे परम पवित्र स्थान असलेले *महाबोधी महाविहार* बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1891 पासून अनागारिक धर्मपाल यांनी सूरु केलेल्या 134 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातील व भारतातील आदरणीय भिक्खूगण भदन्त आकाश लामाजी , भदन्त विनाचार्य जी , तसेच समस्त भिक्खू / भिक्खुणी संघ , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारा स्थापन केलेल्या रजिस्टर्ड मातृत्व संघटना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,समता सैनिक दल,तसेच देशातील सर्व बौद्ध संघटनांच्या , धार्मिक व सामाजिक संघटना आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मागील १२ फेब्रुवारी 2025 पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणामुळे आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे .
बौद्ध जनतेवर अन्याय करणाऱ्या बौध्दगया टेम्पल एक्ट 1949 ला निरस्त करण्यासाठी व बौध्दगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील बौद्ध भिक्षू , उपासक , उपासिका संघाचा सर्व बौद्ध व आंबेडकरवादी संघटना तसेच संविधान प्रेमी जनतेने समर्थन घोषित करून जास्तीत जास्त संख्येने विशाल शांती मार्च आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे . येताना सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी सफेद वस्त्र ,पंचशील ध्वज, पंचशील दुपट्टा ,सोबत आणावे.
असे आव्हान ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ,समता सैनिक दल,आणि इतर सर्व धार्मिक आणि सामाजिक बौद्धिक संघटना नागपूर यांनी केलेले आहे.