
आशाताई बच्छाव
‘धूम स्टाईल’ने जीवघेणी चोरी! -दुचाकीस्वार दांपत्याचे मोबाईल, मंगळसूत्र हिसकावून ठोकली ‘धूम !’ – दांम्पत्य खाली कोसळून जखमी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बोराखेडी मोताळा मोटारसायकलवर स्टंट करून एखादी चोरी घडवून आणण्याचे प्रकार आपण सिनेमात पाहतो. पण धावत्या दूचाकीचा पाठलाग करून दुचाकीवरील एका दाम्पत्याचे मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून 2 अनोळखी चोरट्यांनी ‘धूम स्टाईल’ धूम ठोकली. 25 मार्चला ही घटना मोताळा ते नांदुरा मार्गावरील सर्वेश्वर नगर पाटील जवळ, मोताळा येथे घडली. या घटनेत एकुण 50 हजाराचा मुद्देमाल लुटल्या गेला आहे.बुलढाणा जिल्ह्यात क्राईम इतके वाढले की, गुन्हेगारांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. चोरी, लूटमार, घरफोडी, गुंडगिरी, खून अशा घटना वाढताहेत. अशा घटनेत बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गतच्या घटनेने भर घातली. सौ स्वाती ज्ञानेश्वर सोळंके रा. टाकरखेड ता. नांदूरा ह्या पती ज्ञानेश्वर सोळंके यांच्या सोबत दुचाकीने घरी जात होते. दरम्यान नांदुरा मार्गावरील सर्वेश्वर नगरच्या पाटी जवळ 12 वाजताच्या सुमारास मागून दुचाकीवर आलेल्या 2 अनोळखी चोरट्यांनी सौ. स्वाती सोळंके यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे एक तोड्याचे सोन्याचे मंगळसूत्र व त्यांच्या पतीचा 10 हजाराचा इंटेक्स कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून धूम ठोकली. मंगळसूत्र हिसकावतांना सोळंके दाम्पत्य दुचाकीवरून खाली कोसळल्याने जखमी झाले. या प्रकरणी सोळंके यांनी तक्रार दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अप नं.136/ 2025 कलम 399 (4) बी एन एस प्रमाणे पुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.