
आशाताई बच्छाव
EXCLUSIVE! आ. सिद्धार्थ खरातांनी सभागृहात फिरवली अवैध धंद्याबाबत ‘चक्री!’ – अवैध धंद्यांना कुण्या ‘आका’चे बळ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मेहकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर -लोणार मतदार संघातील अवैध धंद्यांवर बोट ठेवून ‘कोण्या आकाच्या आशीर्वादाने हे धंदेचालतात?’ या प्रश्नाने सभागृहाचे लक्ष वेधले.आ. खरातांनी हा निशाणा कोणावर साधला हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
वरली- मटका, चक्री या काळ्या धंद्यांनी अवघा जिल्हा व्यापलाय.. अवैध दारू सप्लाय करणाऱ्याने नुकताच एका पोलिसाचा नाहक बळी घेतला तर एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मात्र जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. मेहकर व लोणार मतदार संघात देखील वरली- मटका, चक्री, ड्रग्स अशा अवैध व्यवसायाने डोके वर काढल्यामुळे आमदार सिद्धार्थ खरात सभागृहात आक्रमक झाले. खरात म्हणाले की, मी विधानसभा निवडणूकीत निवडून आलो तेव्हा हे धंदे 3 महिने बंद होते. आता मात्र मेहेकर- लोणार मतदार संघात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. याला कुण्या ‘आका’चे बळ मिळत आहे? कुणाचा आशीर्वाद आहे? असा प्रश्न उपस्थित करीत हे काळे धंदे बंद न झाल्यास याला एसपी जबाबदार राहतील. हा इशू चव्हाट्यावर आणल्या शिवाय राहणार नाही, टोकाची भूमिका घेईल असेही खरात म्हणाले.