
आशाताई बच्छाव
दिव्यांगांसाठी रोजगारांचे नवे दालन
सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांग युवक युवतीच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि युथ 4 जॉब्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला असून, या करारावर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व यूथ 4 जॉब्स तर्फे राज्य सवन्वयक महेंद्र पाटील यांनी स्वाक्षरी केली.
या करारा अंतर्गत जिल्ह्यातील तरुण तरुणींना 100 टक्के यूडिआयडि कार्ड, विविध क्षेत्रातील मोफत प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत.त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्याा स्वावलंबी होण्यासाठी मदत होणार आहे.
यूथ 4 जॉब्स फाउंडेशन गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात दिव्यांच्या व्यक्तीशी संबंधित विविध उपक्रम राबवत आहेत.गडचिरोली मध्येहीी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिकबड मिळत आहे.
या कराराबाबत जिल्हाधिकारी श्री . पंडा यांनीी सांगितले की, दिव्यांग युवकांना सक्षम करण्यासाठी हा करार एक मैलाचा दगड ठरेल तसेच यूथ 4 जॉब्स फाउंडेशनच्या प्रथिनिधीनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आणि अधिकाधिक दिव्यांग युवकापर्यंत पोहोचण्याचा मनोदय व्यक्त केला.