आशाताई बच्छाव
प्रदीप देठे याने एम.बी.बी.एस पदवी प्राप्त करत आई – वडिलांची केली स्वप्नपूर्ती
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/03/2025
जालना जिल्ह्यातील जेमतेम एक हजार वस्तीच्या आंबेगाव येथील प्रदीप देठे याने एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त करत आई -वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आंबेगाव ता. जाफ्राबाद येथील देठे परिवारातील पहिला डॉक्टर म्हणुन प्रदीप कचरूबा देठे पाटील यांने मान मिळविला आहे. त्याने जे. जे. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मुंबई येथून एम.बी.बी.एस पदवी प्राप्त करून आपले आणि आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. परिस्थिती कशीही असो ध्येय ठेवून केलेले काम नक्की ध्येयप्राप्ती करते असा संदेश डॉ. देठे यांनी दिला. या यशाबद्दल श्री. शालिकराम म्हस्के, गौतम म्हस्के, संजय देठे, डॉ.अविनाश सुरुशे, डॉ पवन वराडे, अलकेश सोमाणी, शेख नसीम मुख्याध्यापक नंदकुमार काळे, संजय निकम, ज्ञानेश्वर उखर्डे, संजय बोडखे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस देठे यांना शुभेच्छा दिल्या.






