
आशाताई बच्छाव
शेतकरी हाच खरा उद्योजक
ग्रामीण विकासाची नवी दिशा
नामदेव काशिद – तालुका कृषि अधिकारी, भंडारा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)बदलत्या भौगोलिक परिस्थितीनुसार शेती बेभरवशाची आणि मान्सूनचा जुगार असून, अवकाळी पाऊस, कीड रोग इत्यादी नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन शेतकरी हा शेतात राबराब राबवून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नसून उत्पादनासाठी लागणारा खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा यांच्या सुद्धा बेसुमार वापर होत असून त्यामुळे नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामध्ये पर्यावरण हवा, पाणी, वायू प्रदूषण इत्यादींना सामोरे जाऊन निसर्गाच्या समतोल बिघडलेला आहे आणि त्याचा एकूण परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर होत आहे.
शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन विविध परिस्थितीवर मात करून कौटुंबिक उदरनिर्वाह करिता लघुउद्योग, कुटीर उद्योग शेतीपूरक व्यवसाय करून एक परिवाराचे उदरनिर्वाचे साधन म्हणून आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतीपूरक व्यवसाय करणे महत्त्वाचे आहे आणि त्याचाच *एक भाग म्हणून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग* योजना या केंद्रशासित योजनेच्या लाभ घ्यावा असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी,भंडारा नामदेव काशीद यांनी केले.
दिनांक २६ मार्च २०२५ ला मौजा माटोरा येथे करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून *शेतकऱ्यांनी उद्योजक बनवून शेतकऱ्यांनी केवळ शेतकरी न राहता चांगले उद्योजक बनवून चांगल्या पद्धतीने जीवनमान* जगावे असे मार्गदर्शन केले.
सोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नैसर्गिक शेती गट* मौजा माटोरा स्थापित *दहा ड्रम थेरी युनिटचे* प्रयोगशाळेचे उद्घाटन *किशोर निंबारते सरपंच* माटोरा यांच्या शुभहस्ते करून या संपूर्ण प्रयोगशाळेबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यामध्ये शेतीला वाढता खर्च कमी करून शेती करिता लागणाऱ्या उत्पादनासाठी चांगल्या गुणवत्तेच्या नैसर्गिक निविष्ठांचा शाश्वत वापर करून चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन शेतकरी बांधवांनी शेताच्या बांधावर स्वतःच्या गावांमध्ये तयार करून उत्पादनासाठी लागणारा खर्च यामध्ये बचत करून शेतकरी बांधवांनी त्या निविष्ठा वापरून चांगल्या चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन घ्यावे असे प्रतिपादन केले.
१० ड्रम युनिटमध्ये शेतीसाठी लागणारे सप्तधन्यस्तरी, हुमिक असिड, फॉलिक ऍसिड, ट्रायकोडर्मा, दशपर्णी अर्क, इत्यादी नैसर्गिक निविष्ठांचे हे शेतकरी गटामार्फत उत्पादित करून शेतकरी बांधवाना त्यांचे शेतामध्ये उत्पादित भात, भाजीपाला, फळबाग आणि शेती उत्पादनासाठी करावा.
दहा ड्रम थेरीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी वापर करून नैसर्गिक रित्या विषमुक्त उत्पादन करून जमिन,पाणी,हवा आणि सजीवसृष्टीचा समतोल साधून मातृभूमीला जिवंत ठेवून जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची वाढ करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
सदर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून सूर्यकांत मरघडे जिल्हा संसाधन व्यक्ती,मंडळ कृषी अधिकारी जीवन ढगे, कृषी पर्यवेक्षक अरुण हारोडे,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, उपस्थित होते. गावचे प्रथम नागरिक किशोर निंबारते आणि मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुष शेतकरी उपस्थित होते.
कृषि विभागातील कृषि सहायक मीनाक्षी लांडगे, एकता मानकर, अश्विनी उईके, प्रवीण पडघान, कार्यशाळा उपस्थित राहून *दहा ड्रम थेरी बद्दल सविस्तर* माहिती आणि रवींद्र तीतीरमारे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण हारोडे कृषी पर्यवेक्षक यांनी केले तर कार्यक्रम आजचे उत्कृष्ट सूत्रसंचालन गिरीधारी मलेवार कृषी सहायक माटोरा यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार खुशाल शेंडे यांनी केले.