Home गडचिरोली वडलापेठ लोह प्रकल्पाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिले समर्थन

वडलापेठ लोह प्रकल्पाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिले समर्थन

118

आशाताई बच्छाव

1001354827.jpg

वडलापेठ लोह प्रकल्पाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिले समर्थन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल मे. सुरजागड इस्पात प्रा. लिमिटेड द्वारा वडलापेठ ता. अहेरी ची सार्वजनिक सुनावणी बैठक

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली नियोजन भवन येथे 1.6 MTPA बेनिफिशिएशन प्लांट, 1.2 MTPA पेलेट प्लांट आणि 8×350 TPD चा स्पंज आयर्न प्लांट, सोबत इंडक्शन फर्नेस 0.75 MTPA आणि 0.75 MTPA चा रोलिंग मिल आणि 120 MW चा कॅप्टिव्ह पॉवर प्लांटची स्थापना करण्यासाठी वडलापेठ ता. अहेरी येथील सार्वजनिक सुनावणी बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले.

याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यात उद्योग व्हावे या उद्देशाने जिल्ह्यात उद्योग क्रांती यात्रा काढली सुरजागड व कोणसरी येथे मोठे उद्योग सुरु झाले. त्यात हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. गडचिरोली जिल्ह्याची विकासाकडे सुरु असलेली वाटचाल अशीच सुरु राहावी. जिल्ह्यात उद्योग होत असल्याने आनंद व्यक्त केले. करिता वडलापेठ लोह प्रकल्पाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी समर्थन दर्शविले.

यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, माजी आमदार दिपकदादा आत्राम, राष्ट्रवादी (अ. प.) गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युनिस शेख, तनुश्रीताई आत्राम तसेच जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.