आशाताई बच्छाव
उच्च सुरक्षा नंबरप्लेटचे दर माफक व प्रक्रिया सुलभ करावी!
ग्राहक पंचायत शाखेची शासनाकडे मागणी
लातूर/ प्रतिनिधी
नवीन एच.एस.आर.पी. HSRP नंबर प्लेटचे दर माफक करून नंबर प्लेटची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या शाखेने व जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा अतनूर च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल व्दारे केली आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच.एस.आर.पी.( HSRP ) बसवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे आणि मुद्दत वाढीचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने स्वागत केले आहे. शासनाने नवीन नंबर प्लेट दि.३१ मार्च पर्यंत बसविण्याची निर्देश दिले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच.एस.आर.पी.बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच.एस.आर.पी. बसविण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतु शासनाने जाहीर केलेले नवीन नंबर प्लेटचे दर अवजवी आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एच.एस.आर.पी. ( HSRP ) नंबरप्लेटसाठी तिप्पट रक्कम आकारण्यात येत आहे. उदाहरणार्थ टू व्हीलर नंबरप्लेट साठी आंध्रप्रदेश मध्ये २४५ रुपये, गुजरात १६० रुपये, झारखंड ३०० रुपये, गोवा १५५ रुपये तर महाराष्ट्रात हाच दर ४५० रुपये आहे. तसेच थ्री व्हीलर, फोर व्हीलर व अवजड वाहने यांचे दर इतर राज्यांपेक्षा तिपटीने जास्त आहेत. नंबर प्लेटची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १५० ते २०० रुपये घेतले जात आहेत. एच.एस.आर.पी.( HSRP ) नंबर प्लेटचे दर माफक करून ऑनलाईन नोंदणी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत मोफत करावी, अशी मागणी सर्वसामान्य वाहनधारक ग्राहकांकडून होत आहे. वरील विनंतीवजा मागणीवर सकारात्मक विचार होऊन योग्य कार्यवाही व्हावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, प्राचार्य व्ही.एस. कणसे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अमित कवठाळे, भागवत धुमाळ, महिला आघाडीच्या प्रमुख सौ.संध्या बाळासाहेब शिंदे, उपप्रमुख सौ.गोगलताई धुमाळ, सौ.बिराजदार ताई, सौ.रूक्मीण सोमवंशी तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अतनूर शाखेच्या वतीने हणमंत साळुंके अतनूरकर, प्रविण सोमवंशी, एस.जी.शिंदे, मयुरी शिंदे, व्यंकटेश शिंदे, रामदास जाधव, सौ.सुनिता भंडारे यांनी प्रशासनाकडे केली आहे.






