आशाताई बच्छाव
स्व ऍड भाऊसाहेब देशमुख स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर
पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या सी बी एस ई स्कूल मध्ये मोफत शिक्षणाची संधी
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 25/03/2025
भोकरदन ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना सीबीएसई चे शिक्षणाचे मोफत संधी मिळावी म्हणून या उद्देशाने जनविकास शिक्षण संस्था द्वारे ऍड भाऊसाहेब देशमुख स्कॉलरशिप परीक्षा चे स्वरूप नवोदय प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर ठेवण्यात आले होते. या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तालुक्यातील व परिसरातील वर्ग पाचवी त सध्या शिकत असलेल्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्याकडून स्कॉलरशिप परीक्षा देण्यात आली असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अत्यंत हुशार असून आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना योग्य संधी मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझी खा ऍड भाऊसाहेब देशमुख स्कॉलरशिप माध्यमातून पाच विद्यार्थी उच्चस्तरी जनविकास संस्थेचे पायोनियर इंटरनॅशनल सीबीएससी स्कूलमध्ये इयत्ता सहावी पासून ते दहावीपर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सिद्धांत विलास जाधव यांनी 94% गुण मिळवूनआला असून समर्थ बाबुराव देशमुख याने 90% गुणासह तृतीय स्थान मिळविल्या मयंक प्रवीण सावंत याने 90% गुणासह तृतीय स्थान पटकाविले आहे आर्यनश प्रवीण जोगदंडे 87% टक्के गुण मिळवले आहे अर्णव संतोष दळवी याने 86 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक आहे विद्यार्थ्यांच्या संस्थेचे संस्थापक राजाभाऊ देशमुख कोषाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख संचालक आणि देशमाने तुषार पाटील विराज भंडारे प्रतीक देशमुख इंद्रजीत देशमुख शाळेचे प्रचार्य विशाल इंगळे प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ जनसंपर्क अधिकारी रोशन देशमुख कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.