आशाताई बच्छाव
मियासाहब यांच्या उरूस निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षीही ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) :
दर्गा ह. जानूल्लाह शाह (बाबा) मियासाहब यांच्या 353 उरुसानिमित्त पवित्र रमजान महिन्याच्या 21 व्या रोजा निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी म्हणून दि. 22 मार्च 2025 शनिवार रोजी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दर्गा ह. जानूल्लाह शाह (बाबा) खुद्दाम व्यवस्थापक समितीच्या वतीने दर्गाशरीफ (मस्तगड) जुना जालना येथे
शनिवार दि. 22 मार्च रोजी ठीक सायंकाळी 5:30 वाजता आयोजित कार्यक्रमात शहरातील सर्व पक्षाचे मान्यवर नेते सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन खुद्दाम कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. शनिवार दि. 22 मार्च रोजी दर्गा ह. जानुल्लाह शाह (मियासाहेब) यांचा सालाबादाप्रमाणे उरूस साजरा करण्यात येतो यामध्ये शहर व जिल्ह्यातील सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात हे धार्मिक स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.