Home भंडारा चार महिन्यापूर्वी तयार झालेल्या मनोहर भाई पटेल कॉलेज सिमेंट रोड निकृष्ट दर्जाचे,...

चार महिन्यापूर्वी तयार झालेल्या मनोहर भाई पटेल कॉलेज सिमेंट रोड निकृष्ट दर्जाचे, सिमेंट रोडला भेगा वंचित बहुजन आघाडीची कारवाई करण्याची मागणी

15
0

आशाताई बच्छाव

1001340728.jpg

चार महिन्यापूर्वी तयार झालेल्या मनोहर भाई पटेल कॉलेज सिमेंट रोड निकृष्ट दर्जाचे, सिमेंट रोडला भेगा

वंचित बहुजन आघाडीची कारवाई करण्याची मागणी

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)मनोहर भाई पटेल कॉलेज ते नागझिरा चौक व आजूबाजूचे रस्ते बनलेले आहेत. त्या रोडवर नवीनच सिमेंट रस्ता झालेला असून सिमेंट रस्त्यावर भेगा पडलेले आहेत. पूर्णपणे बोगस काम झाला असून तेथील नगरपरिषदेचे सीओ व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, जगदीश रंगारी, यादोराव गणविर, गणेश गजभिय, शीतल नागदेवे यांनी केली आहे .
सविस्तर वृत्त असे की ,नागझिरा चौक ते मनोरभाई पटेल कॉलेज रोड हा सिमेंट रस्ता दोन-चार महिन्यापूर्वी तयार झाला असून या नवीन तयार झालेल्या रस्त्यावर मोठ मोठ्या भेगा दिसत आहेत .त्याचप्रमाणे पत्रकार डी जी रंगारी यांच्या घरासमोरील रस्ता व डॉ. छाया कापगते यांच्या घरासमोर रस्त्याचे काम झालेले आहेत. त्या रस्त्याच्या आजूबाजूला ज्या नाल्या आहेत त्या नाल्यावरून ज्या सिमेंट फरशी तयार केलेले आहेत त्या फरशा पूर्णपणे कच्चे असून फुटलेले आहेत .त्यामुळे हा बोगस काम झाला असून ठेकेदारावर व नगरपरिषदेचे सी ओ यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. त्याचप्रमाणे परिसरातील जनतेने केलेली आहे. सदर रस्ता मोठा रहदारीचा असून त्या रस्तेला बायपास रस्ता संताजी मंगल कार्यालयाकडून जात आहे. मोठ्या प्रमाणे रहदारी असून शाळेकरी विद्यार्थी येत जातअसतात .कॉलेजचे मुले त्या ठिकाणी अतिशय वेगाने टू व्हीलर चालवत असतात त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी सुद्धा या अगोदर करण्यात आलेली आहे. ते कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा याविषयी लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. ठिकठिकाणी गल्ली बॉडी केअर कचरा अजूनही पडलेला आहे. परंतु हे कार्यकारी अधिकारी निष्क्रिय असून या गोष्टीकडे वेळोवेळी दुर्लक्ष करत आहेत. जेव्हा या ठिकाणी तात्कालीन कार्यकारी अधिकारी माधुरी मडावी मॅडम होत्या त्या माधुरी मॅडमच्या काळात रस्त्यावर एकही झिली दिसत नव्हता, केरकचरा दिसत नव्हता, वेळोवेळी नाल्या साफसफाई होत होती आणि एकदा कंप्लेंट केली की दुसऱ्या दिवशी ताबडतोब कारवाई होत होती. परंतु आता सध्याचे सीओ चे त्यांच्या मुळीच या कामाकडे लक्ष नाही वेळोवेळी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते स्पॉट जागेवर येत नाही आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवता ते थातूरमातूर चौकशी करतात ना आपल्या ऑफिसला निघून जातात आणि त्यामुळे जे बी रस्ते बनवण्यात आले आहेत निकृष्ट दर्जाचे आहेत असा लोकांच्या आरोप आहे बरोबर रस्ते नसून नाल्याच्या बांधकाम सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे आणि म्हणून यावर कारवाई करण्यात यावी योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे व परिसरातील लोकांनी सुद्धा केलेली आहे.

Previous articleबोधगया येथील महाबोधी महाविहारात कॅमेरा, मोबाईल फोन नेण्यावर बंदी मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय
Next articleकेमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here