आशाताई बच्छाव
बोधगया येथील महाबोधी महाविहारात कॅमेरा, मोबाईल फोन नेण्यावर बंदी मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय
संजीव भांबोरे
नागपूर-बोधगया येथील प्रबंधक समितीने 18 मार्च 2025 ला बीटीएमसी कॅमेरा टिकीट काउंटर येथील सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी गया सह अध्यक्ष बीटीएमसी यांच्या आदेशानुसार कोणत्याही पर्यटकाला बोधगया येथील महाबोधी महाविहार येथे कॅमेरा, मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे आदेश मंदिर केअर टेकर तथा सुपरवायझर यांना कारवाई करता आदेश देण्यात आलेले आहे .त्याची प्रतिलिपी लेखापाल बीटीएमसी यांना सूचना तथा कारवाई करिता पत्र देण्यात आलेले आहे .या घटनेचा संपूर्ण भारतवासी त्याचप्रमाणे देश विदेशातील सर्व बौद्ध वासियांनी या घटनेचा निषेध केला असून बिहार शासनाने अशा पद्धतीची कृती करून बोधगया येथील महाबोधी विहाराला बंदिस्त ठेवण्याचा हा त्यांचा डाव असल्याचे लक्षात येते.