आशाताई बच्छाव
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर
नंदुरबार/धुळे संदीप पाटील ब्युरो चीफ: धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज बलिदान मास व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबार विभागाच्या वतीने मोठा मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी नवजीवन रक्त पेढीच्या वतीने रक्त संकलन केले.
सर्वप्रथम छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र बोलून रक्तदान शिबिर सुरुवात करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्ताने युवकांनी छत्रपती शिवशंभू महाराजांकडून प्रेरणा घेऊन सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मागील सतरा दिवसापासून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी धर्मवीर बलिदान मास पाळत आहेत. यावेळी नवजीवन रक्तपेढीच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गैरविण्यात आले.
रक्तदान करण्यासाठी भोणे,भालेर गावातील धारकरी देखील सहभागी झाले.शिबिर नियोजन करण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख नरेंद्र चौधरी,राहुल मोरे,देवबा गुरव,योगेश विसपुते,केतन चौधरी,हितेश भोई,संजय माळी,किशोर माळी,हरीश माळी,अजय माळी,राहुल चौधरी,कौस्तुभ गिरणार,सुमित राजपूत,विजय हिरे,मयूर चौधरी,उमेश भोई,हर्षल बोरसे,कृष्णा चौधरी,मनिष मिस्त्री,ओम चौधरी,दिग्विजय ठाकरे,धारकरी बंधूनी मेहनत घेतली.