Home बुलढाणा साडेबारा लाख हुंडा; १० तोळे सोने, स्कुटी, टिप्पर, पोकलँड एवढं दिलं तरी...

साडेबारा लाख हुंडा; १० तोळे सोने, स्कुटी, टिप्पर, पोकलँड एवढं दिलं तरी पोट भरे ना..! कनका येथील लेकीचा मोताळ्यात छळ…

97

आशाताई बच्छाव

1001308426.jpg

साडेबारा लाख हुंडा; १० तोळे सोने, स्कुटी, टिप्पर, पोकलँड एवढं दिलं तरी पोट भरे ना..! कनका येथील लेकीचा मोताळ्यात छळ…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मेहकर तालुक्यातील कनका येथील लेकीचा मोताळ्यातील अतार कुटुंबाकडून छळ करण्यात आली. पैशांसाठी तिला मारहाण करण्यात आली, सातत्याने माहेरून ५० लाख रुपये आण असा तगादा सासरचे लोक लावत होते. अखेर या त्रासाला कंटाळून विवाहितेने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. डोणगाव पोलीस ठाण्यात मोताळा येथील अतार कुटुंबातील ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती दीपक अतार (२१) या विवाहितेने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. विवाहितेचे लग्न मोताळा येथील साहेबराव अतार यांचा मुलगा दिपक अतार याच्याशी एप्रिल २० मध्ये झाले. लग्नाआधीच प्रीतीच्या वडिलांना
साहेबराव अतार यांच्या खात्यावर हुंडा म्हणन साहबराव अतार याच्या खात्यावर हुडा म्हणून १२ लाख ४५ हजार रुपये आरटीजीएस केले होते. शिवाय लग्नात १० तोळे सोने, नवीन एक्टिवा कंपनीची स्कुटी, तसेच नवरदेवाच्या घराचे फर्निचर चे संपूर्ण काम प्रीतीच्या वडिलांनी स्वखर्चाने करून दिले होते. लग्नानंतर दोन महिने विवाहितेला चांगले वागवण्यात आले. मात्र त्यानंतर क्रेशर प्लॅन्ट सुरू करण्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपये माहेर वरून आण असा तगादा सासरच्या कंपनीने लावल्याचा आरोपी विवाहितेने तक्रारीत केला आहे.वडिलांकडे सध्या पैसे नाहीत असे विवाहितन म्हटले असता नवऱ्याने लाथा बुक्क्यांनी
मारहाण केली. सासू, सासरे, नणंद अश्लील शिवीगाळ करत होते असेही तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या वडिलांनी त्यांच्या मालकीचे टाटा कंपनीचे टिप्पर आणि पोकलँड हे सुद्धा विवाहितेच्या सासऱ्यांना कामासाठी दिले. त्यातून मिळणारे उत्पन्न तुम्हालाच राहू द्या असेही सांगितले. त्यानंतर काही दिवस विवाहितेला चांगली वागणूक देण्यात आली. मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये पोळा सणाच्या दिवशी पुन्हा एकदा सासरच्या लोकांनी विवाहितेला बेदम मारहाण केली माहेर वरून १५ लाख रुपये आणल्याशिवाय
आमच्या घरी येऊ नको असे सांगून तिला घरातून हाकलून लावण्यात आले. तेव्हापासून विवाहिता माहेरी राहत आहे. माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने काही फरक पडला नाही असे तक्रारीत म्हटले आहे. डोणगाव पोलिसांनी विवाहितेचा पती दीपक साहेबराव अतार, सासरा साहेबराव बापूराव अतार, सासू सौ. मंगला साहेबराव अतार व नणंद साक्षी साहेबराव अतार अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleमेहकरात दोन नकली पोलीस? एक जाडजुड तर दुसरा…! हिरडवच्या शेतकऱ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकत… सावध व्हा..
Next articleजिल्हा परिषद च्या तक्रार निवारण दिनात धक्कादायकयक प्रकरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.