आशाताई बच्छाव
मेहकरात दोन नकली पोलीस? एक जाडजुड तर दुसरा…! हिरडवच्या शेतकऱ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकत… सावध व्हा..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :मेहकर पोलीस असल्याची बतावणी करून एका शेतकऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार मेहकर येथे घडला आहे. “आम्ही पोलीस आहोत, चोरीच संबंधाने तपासणी सुरू आहे.. तुमच्या हातातील अंगठ्या व पैसे आमच्या जवळ काढून द्या ” असे म्हटल्यानंतर घर बांधकामाचे सामान घेण्यासाठी मेहकर येथे आलेल्या शेतकऱ्याने स्वतः जवळचे ५० हजार रोख आणि प्रत्येकी ४ ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या नकली पोलिसांजवळ दिल्या आणि नकली पोलिस फरार झाले.. काय झाले कसे झाले शेतकऱ्याला सुचेना, घरी गेल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला त्यानंतर मेहकर पोलीस ठाणे गाठून नकली पोलिसांची तक्रार देण्यात आली..
लोणार तालुक्यातील हिरडव येथील गंगाराम मंगल पुरी (५३) यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. घर बांधकामासाठी गट्टू घेण्यासाठी ते मेहकरला आले होते. गट्टू घेण्यासाठी जानेफळ रोडने गारोळे यांच्या दुकानाकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलने त्यांच्याजवळ आले. पोलीस असल्याचे सांगत त्यांनी पुरी यांना थांबवले. मोटर सायकलवर समोर बसलेला व्यक्ती जाडा होता, त्याने चॉकलेटी रंगाचे जॅकेट व डोक्यात हेल्मेट घातलेले होते, मागे बसलेल्या डाक्यात हल्मट घातलल हात, माग बसलल्या
व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधला होता असे पुरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. आम्ही पोलिस आहोत. “चोरी संबंधाने येथे पोलिसांची चेकिंग चालू असून तुमच्या जवळचे सोन्याच्या अंगठ्या व पैसे आमच्याजवळ काढून द्या” असे ते नकली पोलीस त्यांना म्हणाले. पुरी यावेळी खूप घाबरले, त्यांनी लगेच त्यांच्या जवळच्या अंगठ्या आणि पन्नास हजार रुपये त्यांच्याजवळ काढून दिले. स्वतःला पोलीस म्हणून घेणारे दोघे त्यानंतर जानेफळ घडल्या प्रकारानंतर गंगाराम पुरी खूप घाबरले. त्यांना काही सुचत नसल्याने ते घरी निघून गेले. घरी गेल्यावर मुलगा गणेश याला घडला घटनाक्रम सांगितला. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..