आशाताई बच्छाव
रुग्णवाहिका चालकांच्या वेतनाला ‘ब्रेक !’ – २७ कंत्राटी चालकांच्या कुटुंबीयांचे आर्थिक बजेट कोलमोडले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यातीलप्रा थमिक आरोग्य केंद्रांवरील १०२ रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या २७ कंत्राटी चालकांचे वेतन गेल्या पाच महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे या चालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, त्यांच्या कुटुंबांचीही परिस्थिती बिकट झाली आहे. रुग्णवाहिका चालक नवजात बालकं, गर्भवती माता, बाळंतीण महिलांसह तातडीच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. तसेच सर्पदंश, अपघातग्रस्त रुग्ण, औषध आणि लसींचा पुरवठा आदी सेवा ते पार पाडतात. मात्र, त्यांच्या अथक सेवेला कोणतेही आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.