आशाताई बच्छाव
बिग ब्रेकिंग ! वाळू वाहतूक खून प्रकरणातील आरोपीच्या पित्याने आवळला गळफास ! – चिठ्ठीत लिहून ठेवले मोबाईल पहा… व्हिडिओ झाला व्हायरल ! – मरणांती म्हणाले.. माझा मुलगा निर्दोष!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा लोखंडी टामिने डोक्यात प्रहार करून इरला पुला खाली धामना नदीपात्रात उमेश साहेबराव फदाट यांचा 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री वाळू वाहतूक स्पर्धेतून खून झाला होता. याप्रकरणी वैभव ज्ञानेश्वर भोपळे व पवन ज्ञानेश्वर बकाल यांना पोलिसांनी अटक केली. परंतु काल आरोपी वैभव यांचे वडील ज्ञानेश्वर भोपळे यांनी मुलगा निर्दोष असल्याच्या मानसिकतेतून गळफास लावून आत्महत्या केली असून, त्यांनी एका चिठ्ठीत व्हिडिओ पहा असे लिहून मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील व्हायरल
लिहून माबाइल मध्याव्हाडआ दखाल व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ ‘युवा मराठा च्या हाती लागला असून, यातून या खून प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागू शकतो.
प्रकरण धाड पोलिस अंतर्गत आहे. मृतक उमेश फदाट बोरगाव फदाट या गावातीलच रेती वाहतुकीचा धंदा करणाऱ्या अंबादास कोलते यांच्या टिप्पर वर क्लीनर म्हणून काम करत होते.7 फेब्रुवारी च्या रात्री बारा वाजता ते धामणा नदी पात्राकडे गेले होते. दरम्यान तेथे वैभव ज्ञानेश्वर भोपळे याच्याशी रेती वाहतुकीवरून त्यांचा काही
मापळ पाच्पाराा रता वाहतुकावरून त्याचा काहा
वाद झाला. यावेळी पवन ज्ञानेश्वर बकालही तेथे हजर होते. दरम्यान हा वाद विकोपाला गेला आणि आरोपी वैभवने लोखंडी टामीने उमेश फदाट यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यामुळे उमेश रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाले. यावेळी दुसरा आरोपी पवन बकाल याने सांडलेल्या रक्तावर जेसीबीच्या साहाय्याने वाळू टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मृतकाच्या भावाने पोलिसात तक्रार दिल्यावरून दोघाही आरोपींना अटक करण्यात आली, परंतु आरोपी वैभव भोपळे निर्दोष असल्याच्या मानसिकतेतून
वैभव चे वडील ज्ञानेश्वर भोपळे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून, त्यात लिहिलेले होते की मोबाईल बघा…
• आत्महत्या करते वेळी काय म्हणाले ज्ञानेश्वरजी ?
‘माझा मुलगा वैभव भोपळे हा मामाच्या गावी लहानपणापासूनच राहत होता.. घटना घडली तेव्हा गावात एक कार्यक्रम होता. रात्री दोन वाजता दत्तू फदाट याने वैभवला जीपमध्ये नेले होते. त्याचा जो प्लान होता तो त्याने यशस्वी केला. मध्यरात्री तीन
वाजता गेली. त्यानंतर दत्तू फदाट परतला त्याने गाडी लावली. माझा मुलगा वैभव सकाळपर्यंत नदीत पात्रताच होता. त्याच्या सोबत ड्रायव्हर देखील होता. दरम्यान गावातील रस्त्यावर दत्तू फदाट उभा होता. त्याने मृतक उमेशचा फोन दिला. दरम्यान वैभव वर आळ घेण्यात येऊन गुन्हा नोंदविण्यात आला. दुसरे गावचे आहे असे म्हणून दबाव आणण्यात आला. याची आता सखोल चौकशी होऊन चार ते पाच वाळू माफिया व मास्टरमाईंड यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी ही ज्ञानेश्वर भोपळे यांनी केली आहे.