आशाताई बच्छाव
: श्रमिक सेवा संस्थे तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर ( अविनाश शेलार यांजकडून)
श्रमिक सेवा संस्था कोल्हापुर यांच्या वतीने श्री सत्यसाई सेवा संघटना व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी उपचार व मोफत मोतिबिंदु ऑपरेशन शिबीर याचे आयोजन ताराराणी सांस्कृतीक हॉल मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी श्रमिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. निर्मला कुराडे, संस्थेच्य सेक्रेटरी सौ. शैलजा पोतदार, श्रीसत्यसाई सेवा संघटनेचे प्रसाद धारवाडकर, फेरीवाले शहराध्यक्ष बंदिप साळोखे,. शिंगोशी मार्केट चे अध्यक्ष अजिंक्य मस्कर संस्थेचे कोषाध्यक्ष पैलवान तुकाराम पाटील व संस्थेच्या उपाध्यक्षा अश्विनी इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिक फेरीवाले, महिला बचत गटातील महिला आदी उपस्थित होते.