Home नाशिक नाशिकमध्ये संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी

नाशिकमध्ये संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी

41
0

आशाताई बच्छाव

1001230988.jpg

नाशिक ,( अँड विनया नागरे प्रतिनिधी )    संत नरहरी सोनार पुण्यतिथी च्या निमित्ताने दि.8/2/2025 रोजी बालाजी कोट नाशिक येथे महिला व मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये दोन गटांमध्ये छोटा गट व मोठा गट प्रमाणे मुलांनी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच मुलांसाठी खास फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील घेण्यात आली अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मुलांनी त्यांचे सादरीकरण केले. तसेच अद्वैत अमित नागरे याने देखील लुंगी डान्स यावरती उत्तम प्रकारे वृत्त सादर केले. तसेच पल्लव महालकर यांनी देखील पुष्पा ची भूमिका साकारून जमलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले तसेच वेगवेगळ्या भूमिका साकारत उत्तम सादरीकरण केले. त्या ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या प्रत्येक स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील घेण्यात आली त्यामध्ये देखील महिलांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले. ए वन मिनिट सो अंताक्षरी फन गेम सरप्राईज गेम अशा विविध खेळातून महिलांनी त्यांची कला सादर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णकार महिला मंडळ यांनी केलेले होते. कार्यक्रमांमध्ये मोलाचे सहकार्य सुवर्णकार महिला मंडळाचा अध्यक्ष सौ.मंजुषा कुलथे, हेमा लोळगे, नमिता काजळे आडगावकर, रेखा शहाणे, अँड विनया नागरे , पूजा नागरे, श्रद्धा नागरे, अंकिता काजळे, सोनम कपिले, सविता शहाणे, प्रतिभा नागरे , वंदना माळवे , रंजना महालकर, वैशाली जवळकर सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमांमध्ये भरपूर महिलांनी सहभाग घेतला व अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आलेली होती जेवण झाल्यानंतर बक्षीस वितरण देखील करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here