Home बुलढाणा मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने वरवट बकाल येथे सत्कार समारंभ संपन्न..

मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने वरवट बकाल येथे सत्कार समारंभ संपन्न..

107
0

आशाताई बच्छाव

1001230885.jpg

मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने वरवट बकाल येथे सत्कार समारंभ संपन्न..
स्वप्निल देशमुख
प्रतिनिधी | संग्रामपूर
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांची निवड झाल्याबद्दल तसेच योगेश रावणकार रिंगणवाडी व गोपाल तायडे मरायखेड यांची एमपीएससी मार्फत महसूल विभागात नियुक्ती झाल्याबद्दल सर्व सत्कारमूर्ती यांचा दिनांक 12 फेब्रुवारी रोजी वरवट बकाल येथे सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलाश कडाळे पाटिल यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक असलेल्या अँड भालेराव साहेब यांनी आपल्या भाषणातुन सत्कारमुर्ती यांचे भरभरुन कौतुक केले. यावेळी मराठा पाटील सेवा समितीचे वतीने अँड.भालेराव साहेब, श्रीकृष्ण काळे ,कैलाश कडाळे पाटिल, नाना पाटिल, संजय खोंड, स्वप्निल देशमुख, संतोष रावणकर , विजय तायडे , अणिल पाटिल ,आनंद पाटिल , गोपाल बोरोकार , विशाल बकाल, बजरंग पाटिल, सतिष जवंजाळ, आशिष पाचपोर, समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व सदस्य व समाज बांधवाचे श्रीकृष्ण काळे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here