आशाताई बच्छाव
रविवारी वाशिम येथे भव्य विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा
स्व. मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्था व फिटनेस झोनचे आयोजन
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ- आजच्या युवकांनी व्यायामात सातत्य ठेवून आपले शरीर सदृढ, चपळ व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाला चालना देण्यासाठी बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असोसिएशन विदर्भ, वाशिम जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने व स्व. मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्थेच्या आयोजनातून येत्या रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक जिल्हा क्रीडांगणात भव्य विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेनिमित्त विजेत्यांसाठी हजारो रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये विदर्भश्री विजेत्यासाठी ३१ हजार रुपये, बेस्ट पोझरसाठी ११ हजार व बेस्ट इप्रुवर साठी ७ हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच ० ते ६० वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ६० ते ६५ वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ६५ ते ७० वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ७० ते ७५ वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार, ७५ ते ८० वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार व ८० ते खुल्या वजनी गटात प्रथम ११ हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार व पंचम २ हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच भाग घेणार्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येईल
याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार श्याम खोडे तर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अशोक हेडा व बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष संग्राम गावंडे यांची उपस्थिती राहील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता, शहरचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे, भानुप्रतापसिंह ठाकुर, लक्ष्मणराव इंगोले, राजुभाऊ वानखेडे, राहुल तुपसांडे, अॅड. संतोष मालस, आनंद चरखा, अॅड. नंदकिशोर पाटील, अनिल केंदळे, पुरण बदलाणी, रामदास चांदवाणी, डॉ. प्रमोद कुमरे, गिरीष लाहोटी, सुशिल बेदरकर, डॉ. प्रविण ठाकरे, नितीन मडके, डॉ. शैलेंद्र ठाकुर, गजानन गावंडे आदींची उपस्थिती राहील. तरी या स्पर्धेला क्रिडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आशिष (रामु) ठाकुर यांनी केले आहे.