Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 27 व...

शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 27 व 28 फरवरी ला धम्म मेळावा

125

आशाताई बच्छाव

1001229292.jpg

शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 27 व 28 फरवरी ला धम्म मेळावा

बुद्ध मूर्ती ,संत तुकाराम , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 28 फरवरी ला होणार

भंडारा /गोंदिया लोकसभा खासदार डॉ.प्रशांत पडोळे, भंडारा पवनी विधानसभेचेआमदार नरेंद्र भोंडेकर ,
जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके उपस्थित राहणार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाबोधी उपासक संघ नागपूर च्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे दोन दिवसीय बुद्ध धम्म मेळावा दिनांक 27 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारी 2025 आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ला भिक्षू संघाचे व उपासक संघाचे 8.00 ते 9.30 भिक्षु संघाचे अल्पोहार व उपासक-उपासिकांचे भोजनदान त्याचप्रमाणे महापरित्राण पाठ रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत भदंत विनयबोधी महाथेरो व तथागत गौतम बुद्धांचा भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार आहे. 28 फेब्रुवारी 2025 ला 12 ते 1.30 वाजेच्या दरम्यान तथागत गौतम बुद्धाच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण भदंत विनयबोधी महाथेरो , भदंत नागसेन महाथेरो, भदंत प्रशिलरत्न गौतम, भदंत रत्नसार,भदंत मेत्तानंद , भदंत संघानंद, सदानंद श्रामनेर बुद्धपाल, भिक्षुनी पट्टाचार्य, व संपूर्ण भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार आहे . 1.30 ते 4 वाजेपर्यंत तीन अंकी रमाई नाटक सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत
.संत तुकाराम, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 28 फरवरी 2025 सायंकाळी 4 वाजता करण्यात येणार आहे. वरील संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा कविताताई जगदीश उईके, दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजी नगर ,डॉ मधुकर रंगारी सर्जन भंडारा, एडवोकेट वीरेंद्र जयस्वाल मुख्य संपादक दैनिक कशिष गोंदिया , कवी व साहित्यिक मकरंद पाटील जळगाव हे उपस्थित राहतील .तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे , अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे ,भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड , महाराष्ट्र शासन,समाज भूषण डी जी रंगारी , चिचाळ येथील सरपंच मधुसूदन काटेखाये, पंचायत समिती सदस्य सविता ताई बिलवणे, पंचायत समिती सदस्य सुवर्णाताई रामटेके ,धम्म प्रचारक लिमचंद बौद्ध,

तुळशीदास गवळीकर, कुसुमताई गवळीकर, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, प्राध्यापक राजेश नंदपुरे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे , सामाजिक कार्यकर्ते असित बागडे, सामाजिक कार्यकर्ते सरोज खोब्रागडे,सामाजिक कार्यकर्त्या निमाताई रंगारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत वैशाली मडावी नृत्यांगना यांचे भिम गित, रमाई गीत सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामरावजी घुमनर कांदळी यवतमाळ व सप्त खंजेरी वादक भाऊसाहेब थुटे वर्धा यांच्या संपूर्ण संचासहित प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध ,शांतीवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम), अश्विन मेश्राम, निखिल जीवतोडे, विनायक ढोके, गंगाधर गजभिये, खेमराज चवरे यांनी केलेले आहे.

Previous article28 फेब्रुवारीला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे तीन अंकी रमाई नाटकाचे आयोजन
Next articleवझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.