Home नांदेड मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

154
0

आशाताई बच्छाव

1001226139.jpg

मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

मुक्रमाबाद /प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

११ फेब्रुवारीपासून १२ वी ची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरु झाली असून १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षा तसेच १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने संपूर्ण तयारी केली असून जिल्हा प्रशासनाकडून संवेदनशील केंद्रावर खबरदारी घेण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी समाज माध्यमातून दिली.
मुक्रमाबाद शहरात दोन केंद्रावर परीक्षा सुरळीत व शांततेत चालु आहेत येथील कै. डॉ.भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय मुक्रमाबाद, केंद्र क्रमांक ०२४२ या केंद्रावर एकूण विद्यार्थी संख्या -२३१ पैकी २२२ विध्यार्थी आपले नसीब आजमावत आहेत तर ०९ विध्यार्थी अनुपस्थित होते येथील केंद्र संचालक श्री चन्नावार एस. बी.होते तर रनर मठपती बिग.एस. मुगवणे आर. के. बैठे पथक प्रमुख दासरवार एम.एल. साहाय्यक एच.एम.अंधारे डी.व्ही.शेटवाड.हे होते येथे अतिशय तणावमुक्त कॉफी मुक्त वातावरणात परिक्षा चालु होते.
तसेच श्री छत्रपती शिवाजी कनीष्ठ महाविद्यालयात केंद्रात २९६ पैकी २८९ विध्यार्थी परिक्षा दिले ७ विध्यार्थी अनुपस्थित होते या केंद्रावर केंद्र प्रमुख लंगोटे पंढरीनाथ, मुधोळकर व्हि.डी, बैठे पथकात चोपवाड ए.डी, सोनकांबळे एस.बि,मेड एस.एस.हे होते या केंद्रावर अतिशय कॉपी मुक्त पॅटर्न राबविले नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.या दोन्ही केंद्रावर मुक्रमाबाद येथील कर्तव्य दक्ष अधिकारी सापोनि भालचंद्र तिडके साहेब व पोउपनि अमर केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय शिवाजी आडेकर गोपनीय शाखेचे माधव मलगीवार, दिलीप तग्याळकर, गंगावारे आदिनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here