आशाताई बच्छाव
तळा केंद्रावर १२ वी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शांततेत सुरू
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा केंद्र क्रमांक २७४१ फेब्रुवारी – मार्च २०२५ ची बारावी बोर्ड परीक्षा शांतता, कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होत असून परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तळा केंद्रावर कला शाखा ६५, वाणिज्य शाखा ८६ तर विज्ञान शाखा ७० असे एकूण २२१ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेशशेठ देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवरांनी १२ वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तळा केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून प्राध्यापक बोळेगावे आय बी, केंद्र उपसंचालक प्राध्यापक भुरे टी एन, स्टेशनरी सुपरवायझर श्री प्रसाद सुतार, लिपिक श्री स्वप्निल वरंडे तर शिपाई म्हणून श्रीमती के के सुतार काम पाहत आहेत. झूम ॲपद्वारे रायगड जिल्हाधिकारी यांना तळा केंद्रावरील परीक्षा शांतता, कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पोलीस बंदोबस्त व बैठे पथकांच्या उपस्थितीत पार पडत असल्याचे लाईव्ह चित्रीकरण दाखवण्यात आले. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉम्प्युटर सेंटरच्या संदिका बारटक्के व तळा येथील श्री उमेश सर यांनी कॉपी करून खाली नका घालू मान अभ्यास करून वाढवा रायगडची शान, अभ्यास करा व आत्मविश्वासाने म्हणा मी कॉपी करणार नाही, कॉपीमुक्त परीक्षा प्रगतीची नवी दिशा असे स्लोगन असलेले पोस्टर परीक्षा केंद्राच्या आवारात लावून कॉपीमुक्त परीक्षा अभियानास प्रोत्साहन दिले आहे.