आशाताई बच्छाव
पत्नीच्या हत्येचा बनाव उघड; पतीच निघाला खुनी!
दाभाडी ‘दरोडा’ प्रकरणाचा धक्कादायक उलगडा
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे
घडलेला कथित दरोड्याचा प्रकार प्रत्यक्षात एका हत्येचा बनाव असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. पत्नीची हत्या करून दरोड्याचा देखावा रचणाऱ्या डॉ. गजानन टेकाडे (वय ४५) या पशुवैद्यकावर बोराखेडी पोलिसांनी २९ जानेवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अनैतिक संबंधातून आरोपीने हा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे
आरोपीस पोलीस कोठडी
२० जानेवारी रोजी डॉ. टेकाडे यांच्या घरात दरोडा पडल्याची माहिती समोर आली होती. मात्र, तपासादरम्यान संशयास्पद गोष्टी आढळल्याने पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली. डॉक्टरच्या मोबाइलवरील व्हिडिओ आणि संदेशांमधून धक्कादायक माहिती समोर आली.
दरोड्याचा बनाव
डॉ. टेकाडे यांचे आपल्या पत्नीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या युवतीसोबत अनैतिक संबंध होते.
त्यामध्ये पत्नी आड येत असल्याने त्याने तिला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि उशीने गुदमरून हत्या केली. यानंतर पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी स्वतःही गुंगीच्या गोळ्या घेऊन जखमी असल्याचे भासवले आणि घरात दरोडा पडल्याचा देखावा उभा केला.
पोलिस तपासात फुटले आरोपीचे बिंग
दरोडा पडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन तपास सुरू केला होता घटनेनंतर आरोपीने पोलिसांना सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी संशयास्पद बाबी ओळखत, वैज्ञानिक आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हा दरोड्याचा बनाव फोडून काढला. दागिने घरातच सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला होता
अॅसिडिटीच्या म्हणून दिल्या झोपेच्या गोळ्या
गजानन टेकाडे याने १९ जानेवारीच्या रात्री अॅसिडिटीच्या म्हणून झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर रात्री पत्नीचे तोंड उशीने दाबले पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर टेकाडेने घरातील कपाट अस्ताव्यस्त केले, तसेच पत्नीच्या अंगावरील दागिने काढून घेतले ठाणेदार सारंग नवलकर, पोलिस उपिनरीक्षक राजेंद्र कपले, मधुकर महाजन, हेकॉ नंदकिशोर धांडे, रामदास गायकवाड, पोकों श्रीकांत चिटवार, प्रविण पडोल, विनोद नरोटे, अमोल खराडे, सुनिल भवटे आदींनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
काही दागिणे गहाळच; आरोपी आणखी वाढणार!
आरोपी डॉक्टरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर तपासात पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, एसडीपीओ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे व बोराखेडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सारंग नवलकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, माधुरी टेकाडे यांचे काही दागिने अद्याप सापडलेले नसून, या गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार करीत आहेत.






