Home बुलढाणा अवैध रेती उपसा थांबता थांबेना प्रशासन हदबल…

अवैध रेती उपसा थांबता थांबेना प्रशासन हदबल…

69

आशाताई बच्छाव

1001208111.jpg

अवैध रेती उपसा थांबता थांबेना प्रशासन हदबल…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली आणि देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णाच्या हद्दीमध्ये महसूल व पोलिस प्रशासन कारवाई करते की काय का नसतेच थातूरमातूर कारवाई करते अशी परिस्थिती खडकपूर्णा धरणाच्या बाबतीत दिसून येत आहे
सर्वसामान्य लोकांना दिसणाऱ्या अवैध बोटी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांना दिसत नाही सर्वसामान्य जनताला दिसतात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे पथक हवे तेच विरले की काय असे परिस्थिती खडकपूर्णा धरणामध्ये सध्या दिसून येत आहे काही दिवसापूर्वी धरणामध्ये ड्रोनच्या साह्याने सुद्धा सर्व केला होता त्यामध्ये सुद्धा अधिकारी यांना काहीच दिसले नाही परंतु सर्वसामान्य जनतेला मोबाईलच्या कॅमेर्‍याने सुद्धा दिसते ही मोठी तफावत महसूल व पोलीस प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये दिसून येत आहे 22 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी खडसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये खडकपूर्णा प्रकल्पात धडक मोहीम राबवली व 12 ते 15 बोटी ब्लास्ट केल्या त्याचे काही पुरावे सोशल मीडियाच्या हाती आल्यानंतर पंधरा कोटी ब्लास्ट केल्याचे प्रसिद्धी पत्र सुद्धा अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीस काढण्यात आले व प्रशासनाने दबंग कारवाई हाती घेतले असून आता रेतीचा एक खडाई धरणातून बाहेर निघणार नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा काही जबाबदार अधिकाऱ्यांचे आले त्याच्यानंतरही सातत्याने कारवाई सुरू राहणार धरणामध्ये गस्त सुरू राहणार असे सांगण्यात आले होते त्यानुसार दोन ते तीन दिवस धरणामध्ये एनडीआरएफ पथक धारणात सोडण्यात आले परंतु एनडीआरएफ ला एकही बोट हाती लागली नाही याचे नवल वाटते विशेष म्हणजे 22 ते 23 जानेवारी च्या दरम्यान जी धडक मोहीम राबवले गेले त्यामध्ये सुद्धा अनेक बोटी दुर्लक्षित केल्या गेल्या असे धरणाच्या आजूबाजूला लोकांमध्ये कुजबुज आहे आता दोन-तीन दिवस एनडीआर एफ पथक धरणात असताना त्यांना ह्या बोटी का मिळाल्या नाही प्रशासन ड्रोन कॅमेराने धरणामध्ये बोटी शोधते त्यांना बोटी सापडत नाही शोधूनही सापडत नाही मग संजय पन्हाळकर यांच्याच कॅमेरात बोटी आणि गाड्या का येतात हा यक्ष प्रश्न निश्चितच उभा आहे दोनच दिवस कुठेतरी रेतीमाफी यांनी आपल्या गाड्या घराला लावून ठेवल्या त्यानंतर मात्र पुन्हा ते हळूहळू रेती वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले आता मात्र हे सिद्ध झाले आहे
कुठेतरी प्रशासन कमी पडते आहे कारवाई करण्यामध्ये प्रशासनाच्या उनिवा आहेत आणि फक्त पंधरा बोटी फोडून भागणार नाही तर अजूनही असंख्य बोटी धरणामध्ये आहेत त्याचाच हा लाईव्ह पुरावा हाती लागला आहे प्रशासनातलेच कारवाई करण्यासाठी पाठवल्या जाणारे काही अधिकारी हे आर्थिक देवाणघेवाणीतून अनेक बोटींकडे दुर्लक्ष करतात व त्यातून आजपर्यंत अनेक बोटी पकडल्या गेलेल्या नाही असा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे गनिमी कावा करून गुप्तहेर नेमून कारवाई केल्यास बोटीनचा समूळ नायनाट करण्यास वेळ लागणार नाही प्रशासनाने पुन्हा एकदा नियोजनबद्ध व्यवस्थित रित्या दबंग कारवाई करावी

Previous articleहायवे क्र ५३ देतो अपघाताला आमंत्रण..! कंटेनर व आयशर मध्ये समोरा – समोर धडक मध्ये चारजण गंभीर जखमी..!
Next articleपत्नीच्या हत्येचा बनाव उघड; पतीच निघाला खुनी! दाभाडी ‘दरोडा’ प्रकरणाचा धक्कादायक उलगडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.