आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे परिंचे गावात बांबू शेती कार्यशाळा व शेतकरी मेळावा संपन्न. आज परींचे गावांमध्ये बांबू शेती कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी गावातील अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्याचबरोबर परींचे गावचे ग्रामसेवक श्री शशिकांत सावंत कृषी विस्तार अधिकारी श्री निकेतन द्यापते गावचे सरपंच अर्चना राऊत मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली हा मेळावा पंचायत समिती पुरंदर कृषी विभाग यांच्या मार्फत भरवला होता या मेळाव्याला पंचायत समितीतील श्री विजय खेडकर सर श्री महेंद्र गिरमे सर त्याचबरोबर अनेक कृषी खात्यातील अधिकारी उपस्थित होते बांबू बद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होवी आणि त्याना त्याचे महत्त्व समजून जास्तीत जास्त लाभार्थी बांबू लागवडीच्या योजनेत बसवावे यासाठी अग्रिहिता ग्रूप ऑफ कंपनीस चे सीईओ श्री रणजित जी गुळवे सर तसेच अग्रिहिता चे सीएमओ श्री प्रशांत जी नागणे सर तसेच कंपनीचा स्टाफ श्री ज्ञानदेव पवार श्री महादेव यादव श्री रवी गुळवे सर यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी बांबू पर्यावरणासाठी किती महत्त्वाचा आहे बांबू पासून कोणकोणते प्रोडक्ट तयार केले जातात येणाऱ्या काळात प्लास्टिक बंदी करून सर्वांनी त्याला पर्याय असलेले बांबू च्या वस्तूच वापरल्या पाहिजेत तसेच तो शेतकऱ्यांनी का लावणे गरजेचे आहे तो लागल्यानंतर शेतकऱ्यांना येकरी फिक्स इनकम कसा मिळू शकतो त्याची लागवड कशी केली पाहिजे त्याचे संगोपन शेतकऱ्यांनी कसे करावे यासंदर्भात पूर्ण माहिती गुळवे सरानी दिली तसेच पंचायत समिती कृषिविभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची माहिती कृषिअधिकारी विजय खेडकर सर यांनी सर्व शेतकऱ्यांना दिली नंतर सरपंचाकडून बांबू विषयी माहिती घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली






