आशाताई बच्छाव
नरभक्षी वाघाने ठार मारलेल्या ध्रुपता खंडाते या महिलेला यांना 50 लाखाची मदत द्या :-वंचित बहुजन आघाडी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी तर्फे वन विभाग भंडारा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये द्रुपदा किसन खंडाते यांच्यावर नरभक्षी वाघाने धडक घालून ठार मारले. त्यांना पन्नास लाखाची मदत देण्यात यावी या विषयाला धरून निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, भंडारा विभागात येत असलेल्या कवलेवाडा शिवारात शेतात तुरी कापण्या करिता गेलेल्या द्रुपता किशन खंडाते या महिलेला दिनांक 29 जानेवारी रोजी नरभक्षी वाघाने झडप घालून ठार केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे .ही महिला घरची प्रमुख असून त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट आलेली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तर्फे वनविभाग यांना निवेदनातर्फे प्रशासनाकडून त्यांना पन्नास लाखाची मदत देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा तर्फे करण्यात येत आहे. याप्रसंगी निवेदन देतानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी ,वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अरुण गोंडाने , राधेश्याम कावळे, राहुल गजभिये, उमाकांत रामटेके, नितीन गजभिये, परमेश्वर वलके व इतरही कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.






