आशाताई बच्छाव
स्वानिस पेस कंपनीकडून सातेफळ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळाला पाणी फिल्टर भेट
श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सातेफळ अंभोरे येथील केंद्रीय जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेला स्वाणिस पेस कंपनीकडून पाणी फिल्टर देण्यात आली त्या पाणी फिल्टर चे उद्घाटन कार्यक्रम ४फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा सातेफळ या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उत्तम माधवराव आंबोरे प्रमुख उपस्थिती गावचे प्रथम नागरिक बबन नारायण आंबोरे शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मोतीरामजी अंभोरे कंपनीचे सर्कल झोनल असिस्टंट संतोषजी बेंडे सातेफळ गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार श्रीहरी अंभोरे पाटील त्याचबरोबर पाणीपुरवठ्याचे अध्यक्ष केशवराव अंभोरे बबन पाटील शालेय शिक्षण समितीचे सदस्य ज्ञानदेव पांडुरंग अंभोरे व जिल्हा परिषद प्रशाला चे मुख्याध्यापिका सौ संध्या फुलारी शाळेचे उप शिक्षक सातपुते सर चौरे सर जळकोटे ताई सूर्यवंशी ताई त्याचबरोबर सर्व शाळेतील सर्व शिक्षक शाळेतील विद्यार्थी व गावातील इतर प्रमुख नागरिक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मुख्य अतिथी कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रणित कुमारजी यांचे स्वागत स्वागत समारंभ नंतर प्रणित कुमार यांच्याकडून शाळेत भेट देण्यात आलेल्या पाणी फिल्टर चे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चौरे सर तर आभार प्रदर्शन पत्रकार आंबोरे पाटील यांनी केले