
आशाताई बच्छाव
मनुवादी विचार बदलावे लागतील_ प्रा.लीना चीचमलकर
( जिजाऊ – सावित्री जन्मोत्सवात प्रतिपादन )
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आपल्या मुलांची प्रगती किती झालेली आहे ते बघा शिक्षणात माझा मुलगा किती पुढे गेलेला आहे ते बघा. शिक्षण आपण उध्वस्त केलं तर काय होईल ? व्यवस्था संपवून टाका. देश तसाच संपेल आणि म्हणूनच आज आम्ही विकसित झालेलो नाही कारण आमच्या राष्ट्राची शिस्त कुठे चाललेली आहे हे आम्हाला माहितीच नाही ,कारण आज या राष्ट्रातल्या ज्या माँ साहेब आहेत ना ,त्या जरा फेसबुक वर रिलीस करण्यात, डान्स करण्यात ,फेसबुक वर अपलोड करण्यास आमची मासाहेब सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे जरा शिवबा घडवायला वेळ लागतोय असं मला वाटतं .आपल्याला जिजाऊ – सावित्रीचे विचार स्वतःमध्ये पेरण्याची नितांत गरज आहे. पोथ्या , पारायणे,प्रवचने यात अडकून राहू नये.बहुजन समाजाची प्रगती यातून होणार नाही.मनुवादी विचार बदलावेच लागतील.तरच समाजाची,देशाची प्रगती होणार ,असे प्रतिपादन प्रा. लीना चीचमलकर यांनी केले.त्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित जिजाऊ सावित्री जन्मोत्सव कार्यक्रमात शामसुंदर लॉन येथे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
जिजाऊ-सावित्री जन्मोत्सवं कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष व मार्गदर्शिका शिवमती प्रा. लीनाताई चिच मलकर मॅडम नूतन कन्या हायस्कुल भंडारा ह्या होत्या. विशेष अतिथी म्हणून मा. राजूभाऊ कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र हे उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून मा. दिलीपभाऊ सार्वे जि. प. सदस्य भंडारा हे उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री. अनिल भुसारी सर विभागीय अध्यक्ष मसेस,शिवश्री. चंद्रकांत लांजेवार सर जिल्हाध्यक्ष मसेस भंडारा,शिवश्री. राहुल डोंगरे सर मुख्या. शारदा विद्यालय तुमसर, शिवश्री. राजूभाऊ चामट ज्येष्ठ मार्गदर्शक मसेस तुमसर, शिवमती. प्रतिभा लांडगे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड भंडारा, शिवमती. स्नेहल साखरवाडे तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तुमसर हे होते.
राजमाता जिजाऊ व आई सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिजाऊ वंदना शिवमती. शीतल भुसारी यांनी म्हटले.कार्यक्रमाच्या मार्गदर्शक प्रा. लीनाताई चिचमलकर यांचे शेला, ग्रंथभेट व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. विशेष अतिथी मा. राजूभाऊ कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांचे स्वागत शाल, स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन करण्यात आले. तसेच इतर विचारमंच वरील प्रमुख पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेड ची भूमिका जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष हिराताई बोन्दरे यांनी प्रास्ताविक मधून स्पष्ट केली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे आई जिजाऊ -सावित्री यांच्या कार्याचा गुणगौरव दमदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमा मधून करण्यात आला. यामध्ये भारती कन्या हायस्कूल तुमसर ने जिजाऊ वंदनेवर अप्रतिम नृत्य सादर केले तर स्व. गंगुबाई कारेमोरे उच्च. प्राथ. शाळा तुमसर, शारदा विद्यालय तुमसर या शाळेने मराठा सेवा संघाची विचारधारा, जिजाऊ पाळणा या गीताचे नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा. राजूभाऊ कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी समाजात परिवर्तन होईल पण आपल्याला सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आपल्या मनोगतामधून स्पष्ट केले. जिजाऊ ब्रिगेड तुमसर -भंडारा च्या वतीने बुद्धीप्रामाण्यावादी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये 6ते 8 व 9 ते 12 या दोन वयोगट मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व मोमेन्टो आणि एकूण पाच प्रोत्साहनपर बक्षीस रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिजाऊ -सावित्री जन्मोत्सवं च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती. नितुवर्षा घटारे तालुका उपाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड तुमसर व शिवमती. प्रीती भोयर तालुकाध्यक्ष मसेस तुमसर यांनी केले तर उपस्थित मंडळींचे आभार शिवमती. प्रतिभा लांडगे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड भंडारा यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मराठा सेवा संघांचे पदाधिकारी शिवश्री.अनिलदादा झंझाळ,शिवश्री. मने सर, काळे सर,प्रीतम माकोडे सर दीपकदादा बांते,अजयदादा भेदे, सुदामदादा बोरकर, संजुदादा सार्वे तर जिजाऊ ब्रिगेड चे पदाधिकारी शिवमती अंजली लांजेवार, निरूपमाताई भोयर,कल्पनाताई चामट, सुगंधाताई डोंगरे, सुलभाताई हटवार, रंजनाताई सिंगनजुडे, नितुताई सपाटे, सार्वे मॅडम,सीमा झंझाळ, करिष्मा झंझाळ,बाली सार्वे, रत्नाताई मने यांनी सहकार्य केले.