Home जालना माहोरा येथे पत्रकार दिनानिमित्त ग्रामसंसद कार्यालयात पत्रकारांचा सत्कार !

माहोरा येथे पत्रकार दिनानिमित्त ग्रामसंसद कार्यालयात पत्रकारांचा सत्कार !

35
0

आशाताई बच्छाव

1001130716.jpg

माहोरा येथे पत्रकार दिनानिमित्त ग्रामसंसद कार्यालयात पत्रकारांचा सत्कार !
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 08/01/2025

दि,08 जानेवारी [माहोरा ] : येथील ग्रामसंसद कार्यालय मध्ये बुधवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला .या वेळी बाळशास्त्री जांभेकर,यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमात ग्रामसंसद सरपंच गजानन पा.लहाने, कृ.ऊ.बा.माजी सभापती भाऊसाहेब पा.जाधव, भाजपा चे जेष्ठ नेते डॉ.रवींद्र कासोद, व उपसरपंच बाबासाहेब बोरसे,यांनी जेष्ठ तथा जाफ्राबाद तालुका मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित निवडुन आलेले उपाध्यक्ष बाळासाहेब गव्हले,संतोष गौरकर,संतोष वरपे,रामेश्वर शेळके,भास्कर जाधव,शंकर गाडुळे,नवलसिंग राजपुत,मुरलीधर डहाके,गणेश पगारे,परशुराम मुळे,दादाराव गडकरी,कृष्णाकुमार जाधव,संदिप पोटे,गणेश कासोद, आदी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार केला.सरपंच गजानन पा.लहाने,यानी पत्रकारांच्या कामाचे महत्त्व विस्तृत करत त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार बाळासाहेब गव्हले, यांनी पत्रकारांना संबोधित करताना त्यांचा अनुभव सांगितले. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांची चर्चा केली.यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना पत्रकार दादाराव गडकरी,यांनी ग्रामसंसदच्या या उपक्रमाचे कौतुक केले.या वेळी सुभाष पाटील लहाने,भानुदास बोर्डे,सुभाष नाना बोरसे,सुभाषराव देशमुख,भिका सिरसाठ,राजु सिरसाठ,गुलाब कळम,भरत सिरसाठ,जनार्धदन बोर्डे,रामदास मोरे,गणेश जाधव,गणेश गायकवाड,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here